प्रेस मीडिया लाईव्ह :
मोदी सरकार च्या विरोधात पुणे शहर काँग्रेस कमिटी तर्फे एम. जी रोड येथे आक्रोश रैली व कँडेल मार्च काढण्यात आली. काल सकाळी मोदी जी यांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या वेळी आपल्या भारताच्या मुली, महिला रेसलर्स यांना पोलिसांनी मारहाण करून अटक केले आणि त्या राज्यभिषेक सोहळ्यात मोदीजी मात्र बलात्कारी ब्रिजभूषण सिंग यास सन्मान देत होते. सरकार ने ही जी तानाशाही ची सुरुवात केली आहे. आणि आपल्या भारत देशाच्या मुली, आपल्या मुली ह्यांना छाती वर बुटाने मारणे, त्यांना पाठीवर लाठ्या मारणे. रस्त्याने फरफटत नेणे हे भयानक, क्रूर कृत्य आणि अत्याचार ह्या सरकारने पोलिसानंच्या मार्फत केले आहे.काहीही दया माया न दाखविता जणू ते आतंकवादी आहेत अश्या प्रकारे त्यांच्या बरोबर अमानुष पणे वागले.आपल्या देशाला गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या ह्या मुली ,खेळाडू ,यांना लाथा काठयाने मारणे, अटक कारणे , फरफटत नेणे म्हणजे संविधाना ची क्रूर हत्याच आहे जे मोदी सरकार करत आहे.
ह्या महिला खेळाडूंना न्याय मिळालाच पाहिजे आणि बलात्कारी ब्रुजभुषण ह्याला अटक व कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे त्यासाठी पुणे शहर काँग्रेस तर्फे " आक्रोश रॅली " ... कँडेल मार्च चे आयोजन करण्यात आले. एम. जी रोड चे बाटा च्या दुकाना पासून ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जी यांच्या पुतळ्या पर्यंत पुणे कॅम्प पर्यंत ही आक्रोश रॅली काढण्यात आली. ह्या आंदोलनात काही खेळाडू मुली,तर काही ॲथलीट्स पण सहभागी होणार आहेत.
या आंदोलनात अरविंद शिंदे ( अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस ), मोहन जोशी, अभय छाजेड, संगीता तिवारी, कमल व्यवहारे, लताताई राजगुरू, सुजाता शेट्टी, रफिक शेख, नीता राजपूत, वीरेंद्र किराड, रजनीताई त्रिभुवन सर्व ब्लॉक अधस्क्ष व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
पुणे