विद्यार्थी, कार्यकर्ते आणि नागरीकांसाठी कार्यशाळा
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल आणि संविधान प्रचारक लोकचळवळ यांच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, भ्रष्टाचारनिर्मुलन आणि भारतीय संविधान' या विषयावर विद्यार्थी, कार्यकर्ते आणि नागरीकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
गांधी भवन मिनीथिएटर ( एसी हॉल) कोथरूड, पुणे येथे रविवार, २८ मे २०२३ रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर , सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मिलींद गायकवाड हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत . कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी देणगी प्रवेशमुल्य १०० रुपये असून नोंदणीसाठी संदीप बर्वे 9860387827,मनिष देशपांडे 9921945286,सुदर्शन चखाले 788 763 0615,नीलम पंडीत 9823948048 यांच्याकडे नोंदणी करता येईल