पुणे : टिंबर मार्केट येथील लाकूड सामान असलेल्या गोडाऊनला लागलेली भीषण आगीत 5 ते 6 दुकाने जळून खाक



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : आज सकाळी पहाटे ५:०० वाजता टिंबर मार्केट येथील लाकूड सामान असलेल्या गोडाऊनला लागलेली भीषण आगीत 5 ते 6 दुकाने जळून खाक झाली, बाजूला असलेल्या ४ घरे देखील पूर्ण जळाली आहेत आगीचे स्वरूप खुपच भयानक होते परंतु सुदैवाने जीवित हानी कोणाची झाली नाही, परंतु व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या तब्बल 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.


स्थानिक कार्यकर्ते, रोहन थोरात, हरीश लडकत, भैया लडकत, चेतन अगरवाल, दयानंद अडगळे, अविनाश माने, माजी नगरसेवक संदीप लडकत, हिंद बाल समाज मंडळ चे सर्व पदाधिकारी, तसेच लगत असलेल्या काशिवाडी, लोहियानगर चे कार्यकर्ते यांचे मनापासून आभार त्यांच्या सतरकते मुळे मोठी दुर्घटना व होणारी हानी टळली. अग्निशामक दल, तसेच मनपा चे सर्व कर्मचारी यांनी अतिशय जिगरीचे प्रयत्ने करून ही आग आटोक्यात आणली..

Post a Comment

Previous Post Next Post