औंध जिल्हा रुग्णालयाच्या खाजगीकरणा विरोधात शिवसेनेचे आंदोलन



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे, प्रतिनिधी - औंध जिल्हा रुग्णालय अद्ययावत सुविधा उपलब्ध असताना काही शिक्षणसम्राट , बिल्डर, लोकप्रतिनिधी यांचा रुग्णालयाच्या ८५ एकर भूखंडावर डोळा आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मंत्रालयात सदर रुग्णालया संदर्भात पीपीपी तत्वावर विकास करण्यासाठी आरोग्य सचिव व वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत छुपी बैठक  घेतली होती. जिल्हा रूग्णालयात आराेग्यसेवा माेफत देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यावर लक्ष देण्याऐवजी आराेग्यमंत्री त्याचे खासगीकरण करत आहेत. आराेग्य खात्यात पीपीपी माॅडेल हे राज्यात काेठेही यशस्वी झालेले नाही. हा प्रकार म्हणजे कंत्राटदारांचा खिसा भरण्याचा प्रकार आहे. यावरून आधी पीपीपी माॅडेल आणून शिरकाव करायचा आणि नंतर येथील सरकारी जागादेखील अशाच याेजनांच्या माध्यमातून हडप करायची असा हा डाव आहे, असे यातून दिसते. त्यामुळे, सावंत यांनी याबाबत तात्काळ स्पष्टीकरण दयावे आणि येथील सेवा पीपीपी माॅडेल मागे घेण्यात यावे, अशी घाेषणा करावी. यासाठी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. 

यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे , गजानन थरकुडे , प्रसिध्दी प्रमुख अनंत घरत, उपशहरप्रमुख बाळा ओसवाल, भरत कुंभारकर, शेखर जावळे, उमेश गालिंदे, विधानसभाप्रमुख उत्तम भुजबळ, नितीन वाघ, संजय वाल्हेकर, युवासेनेचे सनी गवते, युवराज पारिख, महेश पोकळे, शीतल जाधव, मकरंद पेठकर,  चंदन साळुंके, नंदू येवले, संदीप गायकवाड, संतोष शेलार, योगेश पवार, अतुल गोंदकर, विजय नायर, रमेश क्षीरसागर, विलास सोनावणे, आकाश रेणुसे, रणजित शिंदे, गोविंद निंबाळकर, सूरज मोराळे, संतोष भुतकर, नागेश खडके,  देवेंद्र भाट यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. 

संजय मोरे म्हणाले की, २०१३-१४ मध्ये सदर रुग्णालयात पीपीपी तत्वावर देण्यात आलेल्या काही आरोग्य सुविधांमध्ये बराच चुकीचा प्रकार झाला असून तेव्हाचा विचार चुकीचा व अयशस्वी ठरला असताना आरोग्यमंत्री का अट्टाहास करीत आहेत? सत्ताधारी झालात म्हणजे मंत्र्यांची मनमानी चालेल हे असे होणार नसून शिवसेना नेहमी जनसामान्यांच्या सोबत उभी राहिली आहे. त्यामुळे शिवसेना पुणे शहर सदर पीपीपी मॉडेल ला विरोध करीत आहे. गरीब व मध्यमवर्गीयांच्या आरोग्य सुविधा महागड्या करून धोक्यात टाकणाऱ्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा निषेध करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post