प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : अवामी महाज ' सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी 'ईद मिलन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. १ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता आझम कॅम्पस(पुणे कॅम्प)च्या फंक्शन ग्राऊंड येथे हा कार्यक्रम उत्साहात, सौहार्दाच्या वातावारणात पार पडला. ' संगीत संध्या ' या संगीतमय कार्यक्रमाने रंग भरले. ' अवामी महाज ' चे अध्यक्ष डॉ.पी.ए. इनामदार यांनी स्वागत केले.
मंजुश्री ओक आणि सहकाऱ्यांनी जुनी हिंदी गीते, सुफी गीते तरलपणे सादर केली.
' मौला मेरे मौला ',' आईये मेहरबाँ', 'खुदा ने आसमाँ से ', 'ये समा',' मैने पुछा चाँदसे ', 'सुहानी रात ढल चुकी ' , ' दर्द से मेरा दामन भर दे अल्ला ' अशा एकाहून एक सरस गीतांची बरसात गायकांनी केली आणि हिंदी सिनेसृष्टीचा, संगीताचा सुवर्णकाळच उपस्थितांसमोर उभा झाला !
ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी मंत्री रमेश बागवे,आबेदा इनामदार,अभय छाजेड, प्रशांत जगताप, वीरेंद्र किराड, रवींद्र माळवदकर, साईनाथ बाबर, नारायण लोणकर, एस.ए. इनामदार,नुरुद्दीन अली सोमजी, मुकुंद किर्दत, श्रीपाद ललवाणी, डॉ. काझी, प्रा. इरफान शेख,वाहिद बियाबानी, अंजुम इनामदार, शाहीद शेख,राहुल डंबाळे , बबलू सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 'अवामी महाज 'चे पदाधिकारी,सदस्यांनी संयोजन केले.
.