पुणे पोलिसांनी सापळा रचून 3.2 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

या प्रकरणी पोलिसांनी एका व्यावसायिकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले

प्रेस मीडिया लाईव्ह 

 पुणे पोलिसांना गुप्तचरांनी दिलेल्या माहिती वरून पुणे पोलिसांनी सापळा रचून 3.2 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यावसायिकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुणे ट्रॅफिक पोलीस, लोणी काळभोर पोलीस, हडपसर पोलीस आणि क्राईम ब्रँच युनिट 5 यांनी संयुक्तपणे कारवाई केली.

हडपसर परिसरात पुणे सोलापूर हाय वे वर वरून जात असलेले एक वाहन अडवून तपासणी करण्यात आली. या वाहनात रोख रक्कम आढळली. चौकशी केल्यावर समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नाही. अखेर पोलिसांनी कारवाई केली.

पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लसुर्णे येथील 47 वर्षीय व्यावसायिक प्रशांत धनपाल गांधी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्रशांत यांच्यासोबत त्यांच्या ड्रायव्हरला पण पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.सीआरपीसी 41 डी अंतर्गत पोलीस चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आयकर विभागाला कारवाईची माहिती दिली आहे. पण व्यावसायिक प्रशांत गांधी यांनी निर्दोष असल्याचा दावा केला आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post