पुणे मनपा समोर आम आदमी पार्टीचे "कर वापसी आंदोलन"

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : " सवलत रद्द करून वाढीव मिळकत कर घेताना घाई आणि परत देताना मात्र दिरंगाई,  जाचक अटी, 25 रुपये फी" अशा महानगरपालिकेच्या भोंगळ्या मिळकत कर धोरणाचा आज आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या बाहेर  "कर वापसी आंदोलन" करून निषेध व्यक्त करण्यात आला. आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कराच घोंगडं अजून भिजतच पडलेल आहे. स्वतः मिळकतीचा वापर करणाऱ्यांना मिळकत करात देण्यात येणारी ४०% सवलत आधी काढून घेण्यात आली आणि नागरिकांच्या प्रखर विरोधानंतर परत बहाल करण्यात आली. मात्र अजूनही ही सवलत कशा पद्धतीने द्यायची याच्या संदर्भात नेमकं कुणालाच काहीही कळत नाहीये. नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. आता पुणे महापालिकेने यासाठी एक फॉर्म जारी केलेला आहे आणि त्याच्याबरोबर ढीगभर कागदपत्रांची मागणी तसेच २५ रुपये फीची  सुद्धा मागणी केलेली आहे. अगोदरच या महागाईच्या काळात सामान्य माणसाला या सरकारकडून गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु सामान्य नागरिकांच्या कष्टाचे पैसे टॅक्स रुपी घेऊन आता तो परत करण्यासाठी नागरिकांकडून वाढीव माहिती मागत आहेत. मुळात यात नागरिकांचा काहीही दोष नाही. पुणे शहरातील नागरिकांना १९६९ पासून असलेली मिळकत करातील सवलत राज्य शासनाने २०१९ पासून बंद केली होती. आता पुन्हा सुरु केली. पण हे करताना *भारतीय जनता पक्ष आणि मनपा प्रशासन या दोघांनी मिळून केलेला घातलेला हा गोंधळ आहे. आता या गोंधळामुळे नागरिकांची फरपट फरफट होत आहे.*

अस्तित्वात असलेली *सोपी मिळकत कर प्रणाली बदलून क्लिष्ट करण्याचा आणि अनेकांना मिळकत कराच्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचा पुणे महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.* नागरिकांच्या कष्टाचा पैसा प्रशासनाला परत द्यायचा आहे की नाही ? का फक्त नागरिकांसाठी काही तरी केल्याचा या प्रशासनाकडून आव आणला जात आहे ?

यावेळी पुढील मागण्या करण्यात आल्या.

*1) 2019 नंतर कर आकारणी झालेल्या मिळकतदारांना 40% मिळकत कर सवलतीसाठी अतिरिक्त कागदपत्रे जमा करण्याचा आदेश रद्द करा. पुणे महापालिकेकडे सर्व मिळकतदारांची संपूर्ण ऑनलाईन माहिती आहे. असं असताना नागरिकांकडे वाढीव माहिती मागण्याची गरज नाही.* 

*2) 2019 पासून घेतलेली वाढीव मिळकत कर रक्कम विनाअडथळा एकवट परत द्या.  नागरिकांकडून वसूल केलेली वाढीव कराची रक्कम कोणताही अडथळा न आणता तातडीने परत द्यावी. त्यासाठी पालिकेने केलेले चार टप्पे हे नागरिकांच्या हिताच्या विरोधात आहेत.*

*3) नागरिकांकडून वाढीव कराच्या स्वरूपात तब्बल 250 कोटी रुपये वसूल केलेल्या पुणे महानगरपालिकेने स्व-मालकीच्या घरात राहणाऱ्या  पुणेकरांवर कर सवलतीच्या अर्जापोटी अजून प्रत्येकी 25 रुपयाचा टाकलेला बोजा रद्द करा.*

*4) पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील मिळकतींना देखील 40% कर सवलत तातडीने लागू करावी.*

पुणे महानगरपालिका समोर झालेल्या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टीचे राज्य संघटक, पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, डॉ अभिजित मोरे, एकनाथ ढोले, किरण कद्रे, सेंथिल अय्यर, सुनीता काळे, वैशाली डोंगरे, साहील परदेशी, शेखर ढगे, रोहन रोकडे, अविनाश भाकरे, संजय भूमकर,अमित म्हस्के, मनोज शेट्टी, श्रद्धा शेट्टी, मिताली वडावराव, उत्तम वडावराव, अमोल काळे, अक्षय दावडीकर, संजय कतारनवरे, चेंथील अय्यर, गणेश थरकुडे, तहसीन देसाई, मीरा बिघे, माधुरी गायकवाड, शिवाजी डॉलरे, फॅबियन अण्णा सेमसन, किशोर मजुमदार, सर्फराज मोमीन, अमोल मोरे, घनःश्याम मारणे, सूरज सोनावणे, जोगिंदर पाल तुरा, साजिद खान, राशीदा सिद्दिकी, समीर अरावडे, रऊफ शेख,  राजू परदेशी, आरती करंजावने, धर्मेंद्र डोंगरे, अनिल घोणे, किरण कांबळे, निखिल नेरकर, मिलींद बागलकोटे, आनंद अंकुश, वीरेंद्र बिघे, ऋतूज बिघे, अनिल कोंढाळकर, हेमंत बिघे, विकास चव्हाण, निखिल देवकर, आसिफ बागवान, सुनिता शेरखाने, राजेंद्र साळवे, अमित राखपसरे, सुनंदा जाधव, सचिन कोतवाल, रवी लाटे, बाप्पू रणसिंग, निरंजन अडागळे, मनोज फुलावरे, नरेन्द्र गायकवाड, गणेश जांगमल्ली, अंजली इंगळे, रामभाऊ इंगळे, सुभाष जाधव, शंकर थोरात, ऋषिकेश मारणे, सुजित अग्रवाल हे उपस्थित होते. 



Post a Comment

Previous Post Next Post