प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल अँड आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स ' ,अँग्लो उर्दू बॉईज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज , एम.सी.इ.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावी परिक्षेत यश मिळवले. संस्थेचे अध्यक्ष डॉ .पी ए इनामदार ,उपाध्यक्ष अबेदा इनामदार ,सचिव प्रा. इरफान शेख मुख्याध्यापक शिरीन खान,मुख्याध्यापक रोशन आरा,मुख्याध्यापक राज मुजावर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .
अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल अँड ज्युनियर कॉलेजचा निकाल ८८.२० टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल ८७.५० टक्के इतका लागला. कला शाखेचा निकाल ६२.२६ टक्के,तर वाणिज्य शाखेचा निकाल ९३ टक्के इतका लागला. विज्ञान शाखेतून ९१.६७ टक्के गुण मिळवून जैन जान्हवी प्रवीण प्रथम आली . कला विभागात अडसुरे अर्थम रवींद्र ८८.३३ टक्के गुण मिळवून प्रथम आला तर कॉमर्स विभागात अंतुले मारुफ असिफ ८४.१७ टक्के गुण मिळवून प्रथम आला .
'अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल अँड आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स 'चा एकूण निकाल ९६.२० टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल ८७.९० टक्के, वाणिज्य शाखेचा ९६.११ टक्के तर कला शाखेचा ८८.६० टक्के निकाल लागला. मुलाणी मेहविश अयुबखान ही ८१.५० टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आली . कॉमर्स विभागात सय्यद लायेबा शरीफ ९४.१७ टक्के मिळवून प्रथम आली तर शेख आयेशा महमद रफिक ९०.८३ टक्के गुण मिळवून कला शाखेत प्रथम आली.
'एम.सी.इ.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज' चा निकाल ९३.९३ टक्के लागला.विज्ञान शाखेचा निकाल ९४.७७ टक्के इतका लागला. कला शाखेचा निकाल ८० टक्के,तर वाणिज्य शाखेचा निकाल ९७.९० टक्के इतका लागला. शेख आयेशा अफरोज ७९.५० टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आली. कॉमर्स विभागात चव्हाण ख़ुशी राकेश ७९.३३ टक्के मिळवून प्रथम आली तर घडियाली सारा जफर ८६.७० टक्के गुण मिळवून कला शाखेत प्रथम आली.