प्रेस मीडिया लाईव्ह :
आम आदमी पक्षातर्फे आज अलका चौक येथे भारतीय जनता पार्टीचे खासदार ब्रिज भूषण सिंग यांनी भारतीय ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्ती पटूंवर केलेल्या लैंगिक शोषणाविरोधात अलका चौक येथे निषेध व्यक्त करण्यात आला.
आज भारत देशाचे नाव सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी या खेळाडूंनी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. या ब्रिजभूषणला तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आपल्या देशात आपल्या मुली सुरक्षित नाहीत, गेले अनेक दिवसांपासून अलॉम्पिक विजेते खेळाडू उपोषणासाठी बसले आहेत त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली
या आंदोलनात राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, सुरेखा भोसले, मिताली वडावराव, माधुरी गायकवाड, सुनिता काळे, वैशाली डोंगरे, श्रद्धा शेट्टी, मिरा बिघे, सुनिता शेरखाने, शमीम पठाण, मीना नावस्कर, अंजली इंगळे, फाबियन सेमसन, साहिल परदेशी, शिवाजी डोलारे, अमोल काळे, गणेश थरकुडे, उत्तम वडावराव, गणेश ढमाले, किशोर मजुमदार, निलेश वांजळे, विरेंद्र बीघे, हेमंत बिघे, राजु परदेशी, आनंद अंकुश, किरण कद्रे, शेखर ढगे, प्रशांत कांबळे, संजय कतरनवरे, विकास चव्हाण, मनोज शेट्टी, अविनाश भाकरे, सर्फराज मोमीन, चेंथील अय्यर, सुजित अग्रवाल, ऋतुज बिघे, शंकर थोरात, किरण कांबळे, रामभाऊ इंगळे, कुमार धोंगडे, सुनील भोसले, घनश्याम मरणे, सूरज सोनावणे हे उपस्थित होते.