'फडणवीस यांचे दोन गुन्हे प्रतिज्ञापत्रात नोंदविण्याचे राहून गेले' !

 फडणवीस यांचे वकील ऍड. डबले यांची न्यायालयात कबुली

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे/ नागपूर :

 विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिज्ञापत्र तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यांच्या वरील गुन्ह्यांची माहिती नोंदवीत असताना दोन गुन्हे नोंदविण्याचे नजरचुकीने राहून गेल्याची कबुली फडणवीस यांचे वकील ऍड. उदय प्रभाकर डबले यांनी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ( नागपूर ) यांच्यासमोर न्यायालयात दिली.

 फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन गुन्ह्यांची माहिती लपविल्याने कारवाई करावी यासाठीचा खटला ऍड सतीश उके यांनी फडणवीस यांच्यावर दाखल केला आहे. या खटल्याची सुनावणी ६ मे रोजी झाली. या न्यायालयीन कामकाजाची प्रत नुकतीच प्राप्त झाली . त्यामध्ये साक्षीदार ऍड. डबले यांनी चूक मान्य केली. या प्रकरणाचा पुढील सुनावणी ७ जून रोजी होणार आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास फडणवीस यांना निवडणूक बंदीची कारवाई आणि कारावास होऊ शकतो.  फिर्यादी एड.सतीश उके यांच्यावतीने अॅड. तरुण परमार यांनी काम [पाहिले.या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देते याची उत्कंठा राज्यात  आहे.  

खटल्याचा इतिहास :

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे दिलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःवर दाखल असलेले गुन्हे लपवून ,खोटी माहिती दिल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात एड. सतीश उके यांनी दाखल केलेल्या समरी क्रिमिनल केस २७०३६/२०१९ मध्ये सुनावणी  सुरू आहे.प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी (नागपूर ) यांच्यासमोर ही सुनावणी सुरु आहे.

लोकप्रतिधीत्व कायद्याचे कलम १२५ ए अंतर्गत उके यांनी नागपूर च्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याकडे यासंबंधी खटला दाखल केला होता. पुढे सर्वोच्च न्यायालयातही फडणवीस यांना याप्रकरणी दिलासा मिळाला नाही.त्यांना याप्रकरणी नागपूर न्यायालयाने जामीन दिलेला आहे. या प्रकरणाचा निकाल फडणवीस यांच्या विरोधात गेला तर त्यांना ६ महिने कारावास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षाना सामोरे जावे  लागू शकते. 

देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात १९९६आणि १९९६ मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागपत्रांसर्भात गुन्हा दाखल झाला होता. परंतु दोन्ही प्रकरणात आरोपांची निश्चिती झाली नव्हती. अॅड. सतीश उके यांच्या आरोपांनुसार, फडणवीसांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात या गुन्ह्यांची माहिती लपवली होती. अॅड. सतीश उके २०१४  पासूनच देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढवत आहेत.


सोबत :न्यायालयीन कामकाजाची प्रत आणि माहितीकरिता स्थानिक वृत्तपत्रातील प्रकाशित बातमी 


........ ..............................................................................

~ Media Co Ordination : *Dr.Deepak Bidkar*,

Prabodhan Madhyam(News Agency),Pune 9850583518

Post a Comment

Previous Post Next Post