दिशा सोशल फाऊंडेशनचा उपक्रम
प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी : दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने मंगळवारी (दि.९ मे) चिंचवड येथे डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात मध्यवर्ती असलेल्या एच. एच. कंपनीच्या मैदानावर गुरुवार दि. ११ मे पासून मंगळवार दि. १६ मे पर्यंत शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे सलग सहा दिवस, सहा प्रयोग होणार आहेत. या महानाट्याचे औचित्य साधून डॉ. कोल्हे यांची मुलाखत दिशा सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष नाना शिवले घेणार आहेत.
चिंचवड, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे मंगळवारी (दि.९) सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात शंभूराजांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शहराचे प्रथम महापौर व हवेलीचे माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते डॉ. कोल्हे यांचा सत्कार होणार आहे. या समारंभात ब. हि. चिंचवडे. श्रमिक गोजमगुंडे, संजय पाचपुते, प्रद्योत पेंढारकर, दिनेश ठोंबरे, आयुष तापकीर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे माजी अध्यक्ष गोरख भालेकर व माजी कार्याध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
हा मुलाखतीचा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे.
प्रेक्षकांनी नियोजित वेळेपूर्वी १० मिनिटे आसनस्थ व्हावे. प्रवेशासाठी प्रथम येईल, त्यास प्राधान्य, काही जागा मान्यवरांसाठी राखीव आहेत.