प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल : पनवेल शहरातील महात्मा गांधी रोड मोहल्ला मशीद शेजारील रस्त्या खचल्या बाबत चौकशी करण्याची मागणी पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
पनवेल शहरातील महात्मा गांधी रोड पाडा मोहल्ला येथील मज्जिद शेजारील रस्ता खचून टँकरचा अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडता घडता टळली आहे. या रस्त्याच्या नुकतेच डांबरीकरण करण्यात आले आहे. या कामात हयगय केल्याने रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याने हा रस्ता खचला आहे तरी संबंधित कामाबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.