प्रेस मीडिया लाईव्ह :
मळसुर,पातूर तालुक्यातील मळसुर ,चान्नी, पाडसिंगी, गावंडगाव, पांगरताटी , शेतशिवार वगळता तालुक्यातील इतर गावांतील शेतशिवारामध्ये जवळपास पाच वेळा अवकाळी गारपीट, वादळ व मुसळधार पावसान शेतकऱ्यांच्या रब्बी उन्हाळी पिकांना फटका देऊन लाखो रुपयांचे नुकसान केले आहे.
यावेळी मळसुर शेतशिवारामध्ये अवकाळी गारपीट, वादळ व पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेत येथील अनेक शेतकऱ्यांनी कांदा उपटून कांद्याचे पगर लावून ठेवलेले असताना 30 एप्रिलला मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास आलेल्या अवकाळी गारपीट व मुसळधार पावसाने मळसुर शेतशिवाराला झोडपून काढल्याने शेतकऱ्यांनी लावून ठेवलेले कांद्याचे पगर पाण्यावर तरंगले. तसेच ज्या शेतकऱ्यांनी मजुराअभावी त्या शेतातील कांदे गारपिटीच्या तडाख्याने व मुसळधार पावसामुळे जमिनीमध्ये सडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असून सदर कांदा ,मुंग ,उपटणी योग्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सदर गारपीट, वादळ व मुसळधार पावसामुळे उन्हाळी ज्वारी, मुंग टरबूज बाजरी व भाजीपाला व आंबे पीक जमिनीवर लोळल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पिकातून उत्पादन खर्च शेतकऱ्यांना वसूल झाला नसल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला असून पुढील खरीप पेरणीचा व बारमाही प्रपंच खर्च कसा करावा, ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.