प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई, दि.३०- सहा महिन्यांपूर्वी भिलार-महाबळेश्वर येथे झालेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पहिल्या ऐतिहासिक अधिवेशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांना दिलेला शब्द आज खरा करुन दाखविला आहे .
डिजिटल मीडिया सह इलेक्ट्रॉनिक्स माध्यम अस्थापनांना “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राष्ट्रीय डिजिटल प्रेस मीडिया संघाचे संस्थापक अध्यक्ष मेहबूब सर्जेखान व राज्य उपाध्यक्ष सखाराम जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.