‘महामार्गा’च्या खादाड पोलिसांना आवर घालणार कोण..?

ट्रक चालकांवर खुलेआम दरोडा, लुटीचा परवाना दिला कुणी..?

प्रेस मीडिया लाईव्ह :

महामार्गाच्या खादाड पोलिसांच्या काळ्या कारनाम्यांसह काळाचिठ्ठा खटाटोपच्या हाती लागला आहे. दिवसाढवळ्या ट्रक चालकांवर दरोडा घालणार्‍या या खादाड पोलिसांना लुटीचा परवाना दिला कोणी असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रकरणी वरिष्ठांशी संपर्क साधला असता त्यांनी सरकारी छाप उत्तरे दिली. महामार्ग पोलिसांमधील भ्रष्ट खादाडांच्या लुटीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. आम्ही स्वतः आता वरिष्ठ पातळीवर पुराव्यासह पत्रव्यवहार करणार आहोत.

महामार्गाच्या खादाड पोलिसांच्या काळ्या कारनाम्यांसह काळाचिठ्ठा खटाटोपच्या हाती लागला आहे. दिवसाढवळ्या ट्रक चालकांवर दरोडा घालणार्‍या या खादाड पोलिसांना लुटीचा परवाना दिला कोणी असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रकरणी वरिष्ठांशी संपर्क साधला असता त्यांनी सरकारी छाप उत्तरे दिली. महामार्ग पोलिसांमधील भ्रष्ट खादाडांच्या लुटीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. आम्ही स्वतः आता वरिष्ठ पातळीवर पुराव्यासह पत्रव्यवहार करणार आहोत.


धुळे जिल्ह्यातील शिरपुर येथील गुलाबी चिठ्ठीद्वारे महामार्ग पोलिस प्रत्येक ट्रक चालकाकडून २०० ते ३०० रुपये वसुली करीत असल्याचे वृत्त साधारणपणे वर्षभरापुर्वी खटाटोपने प्रकाशित केल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी संबंधीतांवर लगामही घातला गेला होता. गुलाबी चिठ्ठीचे प्रकरण बंदही झाले होते. आता दि.२१, रविवार रोजी महामार्ग पोलिस मालेगाव मधील काही खादाडांच्या खाऊ प्रवृत्तीचे दर्शन आम्हाला घडले. मालेगाव महामार्ग पोलिस मदत केेंद्र ज्या ठिकाणी आहे. त्याच ठिकाणी  रस्त्याच्या दोन्ही बाजूला भल्या मोठ्या प्रमाणात ट्रकच्या रांगा लागलेल्या होत्या. ट्रका थांबलेल्या पाहुन कुतुहल जागे झाले. प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी जवळ गेलो असता, दिवसाढवळ्या ट्रक चालकांच्या कमाईवर खाकीतील भ्रष्ट दरोडा टाकत होते. केवळ परराज्यातील ट्रकांना टार्गेट केले जात होते. दुपारी १२.२१ मिनिटाला आम्ही लुटीचा हा प्रकार कॅमेर्‍यात कैद केला. एका ट्रक चालकाला बोलतेही केेले. त्याने दिलेल्या माहितीनुसार आमच्याकडून ३०० रुपये घेतले गेले.त्याबद्दल गुलाबी रंगाचे कुपन आम्हाला दिले. कुपन दाखविण्याची मागणी केली असता ट्रक चालकाने ते कुपनही दाखविले. या गुलाबी कुपनवर २० मे ते १९ जुन ही तारीख लिहलेली होती. तसेच वर्तुळात कॅपीटलमध्ये टी.आय. लिहिलेले होते. कोणत्याही प्रकारचा पुरावा हाती लागू नये म्हणून तसेच मुळात हे कृत्यच बेकायदेशिर असल्याने आणि खंडणी प्रकारात मोडत असल्याने गुलाबी चिठ्ठीवर पोलिस दलाशी संबंधीत कोणतीही ओळख दर्शविणारा मजकुर अथवा चिन्ह नव्हते.  विशेष म्हणजे संगनमताने हा प्रकार सुरु होता. याप्रकरणी महामार्ग पोलिसांचे पोलिस अधिक्षक मोहन दहिकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता सुरुवातीला हॅलो...हॅलो... अर्धातासांनी मला संपर्क करा या बोलण्यापलीकडे े संभाषण होवू शकले नाही. अर्ध्यातासानंतर संपर्क केला असता एसपी दहिकर यांनी फोन रिसीव्ह केला नाही. त्या ऐवजी सॉरी मी आता तुमच्याशी बोलू शकत नाही, असा इंग्रजी भाषेतील मॅसेज पाठविला. त्यानंतर आम्ही एपीआय गोपीनारायण या महिला अधिकार्‍याशी मोबाईलवर संपर्क केला असता त्यांनी हा प्रकार कुठे चालू आहे. अशी विचारणा केली. आम्ही महामार्ग पोलिस मदत केंद्र हा स्पॉट सांगितल्यानंतर मी माहिती घेते, अंमलदारांना विचारते असे त्रोटक उत्तर दिले. महामार्ग पोलिसांचे एसपी मोहन दहिकर हे एक प्रामाणिक अधिकारी म्हणून जनतेत परिचत आहेत. त्यांच्या हाताखाली काम करणार्‍या काही भ्रष्ट प्रवृत्तींमुळे हायवे पोलिस खाते बदनाम होत आहे. एसपी दहिकर यांच्या सारख्या प्रामाणिक अधिकार्‍याला कलंकीत करण्याचा प्रयत्न काही भ्रष्ट प्रवृत्ती करत असतील तर त्यावर त्वरीत प्रहार करण्याची गरज आहे. एसपी दहिकर ते पाऊल उचलतील अशी अपेक्षा आम्ही जनतेच्यावतीने करतो.

Post a Comment

Previous Post Next Post