प्रदूषणप्रश्नी मानवी विळखा आंदोलन स्थगित, महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यवाहीचे आश्वासन



प्रेस मीडिया लाईव्ह :

कुरुंदवाड /प्रतिनिधी:

        पंचगंगा नदी प्रदूषण आणि शिरढोण पुलाजवळील  इचलकरंजी कृष्णा-पाणी योजनेच्या बंद असलेल्या पाईपलाईन काढावीत आणि पंचगंगा प्रदूषण प्रश्नी प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी पंचगंगा नदीला मानवी विळखा घालून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांनी दिला होता. प्रदूषित घटकावर तात्काळ कारवाई करू आणि पाणी कमी झाल्यावर जुनी पाईपलाईन काढून घेऊ, असे लेखी आश्वासन प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इचलकरंजी महानगरपालिकेने दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

      दरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता प्रशासनाने न केल्यास पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी दिला आहे.

               पंचगंगा नदीला जलपर्णी ही प्रत्येक वर्षीची समस्या आहे. जलपर्णी प्रवाहित होऊन शिरढोण पुलापर्यंत येते. शिरढोण पुलाजवळ कृष्णा पाणी योजनेच्या पाईपलाईनला येऊन तटते. मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही जलपर्णी जठील होऊन जाळे निर्माण होते. जून महिन्यातील पावसाच्या पाण्याने सदरची जलपर्णीचे जाळे सूटत नाही. ते पाण्यासोबत पुलाला तटते आणि नदीकाठच्या शेतीत विसावते. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी ही पाईप लाईन महापालिकेने तात्काळ काढून घ्यावी  असे निवेदन जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी दिले होते. 

        जिल्हाध्यक्ष कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी पंचगंगा नदीत मानवी विळखा घालण्यासाठी जात असताना इचलकरंजी महापालिकेचे सुभाष देशपांडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबट यांनी त्यांना अडवत आपल्या मागणीची पूर्तता करत आहे, आंदोलन करू नका अशी विनंती केली. मागण्यांची कृती न झाल्यास परत आंदोलन करू, असा इशारा जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी देत आंदोलन स्थगित करत असल्याचे सांगितले.

        यावेळी जिल्हा महासचिव महदेव कुंभार, जिल्हा सहसचिव विश्वास फरांडे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब शिंगे, जिल्हा उपाध्यक्ष महेश महाडिक, प्रसिध्दी प्रमुख संजय सुतार, जिल्हा सह कोषाध्यक्ष संजय कांबळे, कुरुंदवाड शहर अध्यक्ष दीपक कडाळे,  भीमराव गोंधळी, अर्जुन कांबळे, अक्षय कांबळे, जयेश कांबळे, गजानन कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय सुतार

जिल्हा प्रसिध्दी प्रमुख

वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर उ.जिल्हा.

Post a Comment

Previous Post Next Post