सिद्धार्थनगर मधील राजर्षी शाहू समाज मंदिर मध्ये सालाबादप्रमाणे यावर्षीही थाटामाटात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर : सिद्धार्थनगर मधील राजर्षी शाहू समाज मंदिर मध्ये सालाबादप्रमाणे यावर्षीही थाटामाटात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली.

   त्यावेळी उपस्थितांना खीर वाटून कार्यक्रमाची गोडी वाढवण्यात आली. तसेच पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलिस प्रशासनाकडून गौरविण्यात आलेले मा. जितू शिंदे साहेब यांचा देखील सत्कार करण्यात आला.

       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय माळी यांनी केले , सुबोधकुमार कोल्हटकर , मल्हार शिर्के यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त मार्गदर्शन केले व विनोद कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

    यावेळी सुशीलकुमार कोल्हटकर , अमोल कांबळे , स्वाती काळे , चंद्रकांत कांबळे , यश शिर्के , निखिल कांबळे , मिलिंद पोवार , विघ्नेश कुरणे , सचिन सरनाईक , युवराज कांबळे  व योध्दा बॉईजचे कार्यकर्ते उपस्थित होते.

       

जाहिरात, बातम्यांसाठी संपर्क यासारखी आणखी पोस्ट पाहण्यासाठी आणि Press Media Live - News Portal मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇 

https://kutumbapp.page.link/DSHCfyWBrWbgB7iJ7

Post a Comment

Previous Post Next Post