सर्व शहर वासीयांनी आपले सर्व व्यवहार बंद करून जेथे असाल तेथे १०० सेकंद स्तब्ध राहुन रा.छ. शाहू महाराज यांना अभिवादन करावे :
आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख
प्रेस मीडिया लाईव्ह :
श्रीकांत कांबळे
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ६ मे १९२२ या दिवशी निधन झाले यास १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत. या निमित्ताने शनिवार दि.६ मे २०२३ यादिवशी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सकाळी १० वाजता १०० सेकंदासाठी स्तब्ध ठेवून त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. हि स्तब्धता म्हणजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या १०० व्या स्मृती दिनानिमित्त केले जाणारे सामूहिक वंदन असणार आहे. आपले सर्व व्यवहार १०० सेकंद थांबवुन रस्त्यावर जिथे आहे तिथे १०० सेकंद थांबून हे स्तब्धता रुपी वंदन प्रथमच साकारले जाणार आहे. या वंदन कार्यक्रमात केवळ जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील, परदेशातील ज्यांना शाहू महाराजांची थोरवी माहिती आहे ते कोणीही त्यांच्यासाठी स्तब्ध राहून सहभागी होऊ शकणार आहेत.
या अनुषंगाने इचलकरंजी शहरातील सर्व नागरिकांनी सदर मानवंदने साठी सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांचे कडून करणेत येत आहे.
शनिवार दि.६ मे रोजी सकाळी १० वाजता इचल शहरातील विविध ठिकाणी पोलिस आणि अग्निशमन वाहनाद्वारे सायरन वाजविणेत येतील त्यानंतर १०० सेकंद सर्व नागरिकांनी आपले व्यवहार, वाहने आहे त्या ठिकाणी थांबवून स्तब्धता पाळुन रा.शाहू महाराज यांना मानवंदना देणेची आहे.
छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला वंदन म्हणून शाहू स्मृती शताब्दी पर्व साजरे करणेत आले आहे आणि यामधील स्तब्धता कार्यक्रम म्हणजे एक अनोखे वंदन असणार आहे.