प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-टेंबलाई नाका परिसरात निखिल पिंटू गवळी याने दारुच्या नशेत शेजारी रहाणारया आझाद मकबूल मुलतानी (वय 54) यांच्यावर तलवारीने वार केला या मध्ये ते ठार झाले तर त्यांची सून अफसाना असिफ मुलतानी (वय 22).गंभीर जखमी झाल्या.
टेंबलाई नाका परिसरात आझाद मुलतानी हे पत्नी दोन मुले एक सून व नातंवडे समवेत रहात ते सेंट्रिग काम करीत होते एका मुलाचे लग्न झाले आहे तो पेंटींग ची कामे करत तर दुसरा किरकोळ कामे करत असत.आसिफ हे कामावरून नुकतेच येऊन सून अफसाना समवेत जेवत होते तर त्यांची पत्नी तीन लहान नातंवाना घेऊन शेजारी गेल्या होत्या.एक मुलगा कामावर तर दुसरा बाहेर गेला होता.अचानक रात्री साडेआठ च्या सुमारास शेजारी रहात असलेला निखिल गवळी हा दारु पिउन हातात तलवार घेऊन मुलतानी यांच्या घरात घूसून जेवत असलेल्या सुनेच्या पाठीवर हल्ला केला तेव्हा सासरा सुनेला वाचविण्या साठी मध्ये आला असता निखिलने आझाद वर तलवारीने हातावर ,खांदयावर ,पाठीवर सपासप वारकेले त्यात ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.त्यांना मुलग्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असतानाच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले.हल्लेखोर स्वतःहुन शाहुपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला.रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते अधिक तपास शाहुपुरी पोलिस करीत आहेत.