चार पिडीत महिलांची त्याचे ताब्यातुन सुटका केली .
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : मा. पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर श्री शैलेश बलकवडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध वेश्या व्यवसायाचे समुळ उच्चाटन करणे बाबत सुचना दिलेल्या आहेत. मा. अपर पोलीस अधीक्षक सो जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली महादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर व श्रध्दा आंबले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, कोल्हापूर यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत सिद्राम केरबा या नांवाचा इसम हा शिरोली पुलाची ता. हातकणंगले येथील पुणे-बेंगलोर महामार्गा लगत असले पिर बालेसाहेब दर्गा ते सांगली फाटयाकडे जाणारे सव्र्हस रोडवर थांबुन वेश्याव्यवसाय चालवितो अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे छापा कारवाई करणे करीता पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रध्दा आंवले व त्यांचे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षा कडील अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले. बातमीतील नमुद सव्र्व्हस रोडवर पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांचेसह कौशल्यपुर्वक सापळा लावला. त्यानंतर वेश्या व्यवसाय चालवणारे इसमाकडे बोगस गि-हाईक पाठवुन दि. 02/05/2023 रोजी 12.45 वा. छापा कारवाई केली. त्यामध्ये वेश्या व्यवसाय चालविणारे इसम नामे सिद्राम मुरलीधर केरवा, वय 45 वर्षे रा. काडापुर, चिक्कोडी जि. बेळगांव राज्य कर्नाटक यास शिताफीने ताब्यात घेतले व तो वेश्या व्यवसाया करीता वापरत असले झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यातील प्रत्येकी एक परप्रांतीय महिला तसेच कोल्हापूर मधील एक अशा एकुण 04 पिडीत महिलांची त्याचे ताब्यातुन सुटका केली.
सदर छापा कारवाई मध्ये नमुद आरोपी सिद्राम मुरलीधर केरबा याचे कब्जातुन एकुण 11,107/-रु. किंमतीचे रोख रक्कम, मोबाईल व निरोधचे लहान बॉक्स 04 असे जप्त करण्यात आले आहे. नमुद कारवाई मधील आरोपी सिद्राम मुरलीधर केरबा याचेकडे विचारपुस करून चौकशी केली असता त्यामध्ये त्याने आपण अर्थिक परिस्थीती बेताची असलेल्या गरजु महिलांच्या संपर्कात राहुन त्यांना शरिरगमना करीता ग्राहकांना पुरवुन ग्राहका कडुन प्रत्येक महिलेचे 2000/-रु. प्रमाणे रक्कम घेत असतो असे सांगुन आपण वेश्या व्यवसाय चालवित असल्याचे कबुल केले.
त्याच प्रमाणे छापा कारवाई मधील पिडीत महिला यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी आपली आर्थिक परिस्थीती बेताची असुन गरजेपोटी आपण आरोपी सिद्राम केरबा याचे सांगणे प्रमाणे शरिरगमनासाठी ग्राहकां सोबत जात असतो व प्रत्येक कामा मागे सिद्राम हा आपणास 500/-रु. देत असतो अशी हकिकत सांगितली.
छापा कारवाईअंति आरोपी सिद्राम मुरलीधर केरबा याचे विरुद्ध भा. द. वि. सं. कलम 370 सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5, 6, 7 प्रमाणे शिरोली एम. आय. डी. सी. पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तो शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे येथे अटकेत आहे. तसेच यातील पिडीत महिला यांना तेजस्वीनी वसतिगृह येथे ठेवण्यात आले आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रध्दा आंबले, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, कोल्हापूर व त्यांचे कडील अंमलदार सहा. फौजदार राजेंद्र घारगे, रविंद्र गायकवाड, मिनाक्षी पाटील, पो.हे. कॉ. आंनदाराव पाटील, किशोर सूर्यवंशी, पो. ना. अभिजीत घाटगे, म. पो. कॉ. तृप्ती सोरटे, शुभांगी कांबळे, किरण पाटील यांनी केली.