तळागाळातल्या सर्व सामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार !!!.


  प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :                             

कोल्हापूर - कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून आज दुपारी श्री.महेंद्र पंडीतसो यांनी तत्कालीन पोलिस अधीक्षक श्री.बलकवडेसो यांच्या कडुन पदभार स्वीकारला.या अगोदर कोल्हापूरपुरला फक्त देवदर्शनासाठी येत असल्याचे सांगितले.कोल्हापूर जिल्ह्यातील सुव्यवस्था बिघडवणारयावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सर्व सामान्य नागरिक हा शेवटच्या क्षणी पोलिस ठाण्याची पायरी चढ़तो.त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून दयायचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.अदखलपात्र आणि दखलपात्र गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.यापूर्वी कोल्हापूर शहरात श्री.अभिनव देशमुख आणि श्री.बलकवडे यांनी चांगली कामगिरी केली असून त्याच धर्तीवर काम करणार असल्याचे सांगितले.कोल्हापूर शहराची वाहतूक व्यवस्था ही शहरात फिरुन उपाय योजना करणार आहे. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाईसो यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post