बालिंगा परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ....



  प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -बालिंगा येथे चोरट्यांनी दोन बंद बंगल्याचे कुलूप तोडुन सोन्या चांदीचे दागिने लंपास केले या घटनेमुळे तेथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.

काही दिवसा पासून कोल्हापूर शहरात आणि उपनगरात चोरीच्या घडलेलया घटना ताज्या असतानाच करवीर तालुक्यातील बालिंगा परिसरात चोरट्यांनी दोन बंगले फोडून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा अंदाजे सव्वा दोन लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल लंपास केला आहे.तेथे रहाणारे सोपान गायकवाड हे आपल्या मुळ गावी कुंटुंबा समवेत गेले होते त्यांच्या बंद बंगल्याचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून लोंखडी कपाट फोडुन त्यातील सोन्याची चेन ,अंगठी ,चांदीच्या वस्तूसह लहान मुलांच्या कानातील दागीन्यासह रोख रक्कम 50हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली.हा प्रकार आज सकाळी उघकिस आला.तसेच तेथीलच निखील सुतार यांच्याही बंद बंगल्याचे कुलुप तोडुन आतील साहीत्य विस्कटून 10 हजार रुपये लंपास केले.हा प्रकार निखील सुतार घरी आल्यावर निदर्शनास आला .त्यानी तात्काळ करवीर पोलिस स्टेशनला चोरी झाल्याची माहिती दिली.करवीर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि ठसे तदन्याला पाचारण करण्यात आले.या घटनेनंतर तेथे भितीचे वातावरण पसरुन पोलिसांनी गस्त वाढ़वावी अशी जनतेतून मागणी होत आहे. नागरिकांनीही सतर्क राहून गस्त वाढ़वण्याची गरज आहे.

Post a Comment

Previous Post Next Post