नवे पारगाव ग्रामपंचायतचा जबरदस्त निर्णय .!

 


  प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -सध्या टीव्ही वर मालिका चालू असताना मध्ये -मध्ये काही प्रॉडक्टसची जाहिरात केली जाते त्यात सध्या एका शीतपेयाची (स्टींग) जाहिरात जोरात चालू आहे.या जाहीरतीचे तरुण पिढीला मोठी भुरळ घातली आहे.चार्जर या नावाने या शीतपेयाची ((स्टींग)  लहाना पासून मोठ्या पर्यंत सर्वच जण पीत असतात पण या पेया मुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे त्याना माहीत नाही.या पेयात हानीकारक घटक असतात या मुळे गुंगी येते त्यामुळे मुलांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो.


अशी शीतपेये पिण्यामध्ये तरुण पिढीचे प्रमाण अधिक आहे अशा तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी नवे पारगाव येथील ग्रामपंचायतने ग्रामसभेत चर्चा होऊन ठराव मंजूर करण्यात आला.जुने पारगावातही मासीक सभेत ठराव करण्यात आल्याचे  संरपंच तुकाराम पवार यांनी सांगितले की अशी शीतपेये विकताना आढ़ळल्यास त्या दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही ग्रामपंचायतने  दिला आहे.गावात लहान मुलां मध्ये अशी शीतपेये पिण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून  आल्याने नवे पारगाव च्या ग्रामसभेत चर्चा होऊन विक्री साठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे लोकनियुक्त संरपंच वर्षाराणी देशमुख यांनी सांगितले.असा निर्णय समाजहीतासाठी प्रत्येक गावागावात घ्यावा अशी जनतेतून मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post