प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- सिध्दार्थ नगर च्या वतीने मोठ्या प्रमाणात गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली .गौतम बुध्दा प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले.या प्रसंगी बुध्द वंदना,त्रिशरण ,पंचशील ग्रहण करण्यात आले.तसेच महिला जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजेत्याना मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी उलेखनीय काम करणारयांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक डी.एस .सरनाईक ,महादेव कोल्हे ,एस.पी.कांबळे,बाळकृष्ण राजे ,सुबोध कोल्ह्ट्कर ,संजय माळी ,जितेद्र काळे ,स्वाती काळे ,रजनीकांत सरनाईक ,सुशील कोल्हटकर याच्यासह भागातील नागरिक महीला उपस्थित होते सुरुवातीला स्वाती काळे आणि रजनीकांत सरनाईक यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.के.कांबळे यांच्या सह इतर मान्यवरांनी आपले विचार मांडले.तसेच कोल्हापूर शहरात विवीध ठिकाणी गौतम बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.