वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. नागोरावजी पांचाळ यांचे प्रतिपादन
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर/ प्रतिनिधी:
ओबीसींचे आरक्षण, जनगणना आणि इतर प्रश्नाबाबत राज्य व केंद्र सरकार चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत आहे. ओबीसींना आपले मित्र कोण आणि शत्रू कोण याची माहिती होण्यासाठी आणि स्वतःच्या हितासाठी वैचारिक लढाई आपल्याला लढावीच लागेल. सर्व बहुजनांना एकत्रितपणे पुढे घेऊन जाणारा असा वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा चेहरा सर्वसामान्यांमध्ये रुजला आहे. ओबीसींना जगण्याची उर्मी आणि लढण्याची ताकद फक्त प्रकाश आंबेडकरच देऊ शकतात, असे प्रतिपादन वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. नागोरावजी पांचाळ यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे झाला. यावेळी ते बोलत होते. ओबीसी समाजाचे नेते चंद्रकांत कांडेकरी या अध्यक्षस्थानी होत्या.
प्रा. नागोरावजी पांचाळ पुढे म्हणाले, ओबीसींना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नाही. हिंदू मुस्लिम प्रश्नातच त्यांना अडकून ठेवण्यात आले आहे.-महाराष्ट्र भूषण पुरस्कार 25 लाखाचा आणि त्याच्यावरचा खर्च 16 कोटी सरकार करू शकते पण ओबीसी मुलांच्या स्कॉलरशिपची तीन कोटी 23 लाखाची रक्कम शासन चार वर्षात देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आपण कधी समजून घेणार आहोत. आपण स्वतःच्या हितासाठी आणि पोटासाठी जागे होणार की नाही हा आज प्रश्न आहे. आपल्यासमोर चुकीचा इतिहास मांडून मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न मुद्दामहून केला जातो आहे. आपण त्यातच फसत जात आहोत. सर्वसामान्य जनतेला संरक्षण आणि सेवा देण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहे. त्यामुळे ओबीसींनी आपली उत्तरे शोधण्यापासून वंचित राहू नये, असा सल्लाही प्रा. नागोरावजी पांचाळ यांनी दिला.
प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सोमनाथ साळुंखे यांनीही मनोगतात ओबीसी समाजातील पक्ष कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणी, ओबीसी जनगणना, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण, नोकरी व शैक्षणिक आरक्षण, राजकीय जनजागृती आधी विषयावर वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडली.
दिगंबर लोहार, सयाजीराव झुंजार, संतोष पांचाळ, बबनराव कावडे, जिल्हा प्रभारी डॉ.क्रांतीताई सावंत आदींनी मनोगते व्यक्त केली.
या वेळी ओबीसी नेते रवींद्र सुतार, विनायक सुतार, प्रमोद सुतार, जिल्हा निरीक्षक अतुल बहुले, माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय गुदगे, माजी शहराध्यक्ष पुंडलिक कांबळे, फराजान नदाफ, मुमताज मेमन, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुशाप्पा, जिल्हा सचिव विश्वास फरांडे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब शिंगे, जिल्हा सचिव रावसाहेब निर्मळे, जिल्हा उपाध्यक्ष महेश महाडिक, जिल्हा संघटक पृथ्वीराज कडोलकर, जिल्हा सह कोषाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा संघटक संतोष राजमाने, दक्षिण जिल्हा महसाचिव शिवाजी कांबळे, उपाध्यक्ष संतोष सुळकडे, कोल्हापूर शहर उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे, युवक आघाडी जिल्हा महासचिव दिपक कांबळे, कृष्णात कांबळे, करवीर तालुका युवक आघाडी अध्यक्ष नितीन कांबळे, उपाध्यक्ष सागर कांबळे, शाहूवाडी तालुका संघटक शुभम काळे, कुरुंदवाड शहराध्यक्ष दिपक कडाले हे उपस्थित होते, सुरवातीला स्वागत व प्रास्ताविक विलास कांबळे यांनी केले तर उपस्थतींचे स्वागत दक्षिंचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांनी केले तर आभार जिल्हा महासचिव महादेव कुंभार यांनी मानले, कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिन कांबळे यांनी केले.
या वेळी महीला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीताई कांबळे, मनीषा कांबळे, भीमराव गोंधळी, अशपाक देसाई, संजय कांबळे, संदीप कांबळे, दिपक कडाळे, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व युवा, महिला, कामगार व विद्यार्थी आघाड्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, शहराध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
*संजय सुतार*
प्रसिध्दी प्रमुख.
*वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर.*