प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -शनिवारपेठ परिसरातील गवळ गल्ली येथे रहाणारा पृथ्वीराज गवळी (वय 19वर्षे).हा आपल्या सहकारया समवेत पोहण्यास गेला होता ते सर्व जण पोहत असताना त्यांच्यात ईर्षा लागली पृथ्वीराज गवळी हा झपाट्याने सर्वाच्यां पुढ़े येत असताना त्याला दम लागला आणि नाका तोंडात पाणी जाऊ लागले त्याने आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न केला
पण थोड्याच वेळात तो पाण्यात बुडू लागला असता त्याच्या सहकारयानी भिऊन तिथुन काढ़ता पाय घेतला.तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी अग्निशामक दलाला कळविले असता काही वेळातच चारी ही ठिकाणचे बंब घटना स्थळी दाखल झाले.त्यातील रेक्युफोर्स ने पृथ्वीराज गवळीला शोधण्याचा प्रयत्न केला पण रात्री उशिरापर्यंत सापडला नाही.या घटनेची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांनी आणि भागातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.