प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय कोल्हापूर व राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने - इचलकरंजी केंद्रामध्ये अवयवदान व देहदान या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
यावेळी यशोदर्शन फाऊंडेशनचे योगेश अग्रवाल यांनी अवयवदान व देहदान या विषयावर जनजागृत्तीपर प्रबोधनात्मक व्याख्यान देवून इत्यंभूत माहिती दिली.
यावेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आपल्या मनोगतामध्ये समाजातील सर्वच घटकांनी अवयवदान व देहदान याबाबत गैरसमज व अफवापासून दूर राहणे आवश्यक असून या प्रवाहात प्रबोधनात्मक भरीव कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच या विषयांवर जनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त, विभागीय आयुक्त व स्थानिक कामगार कल्याण अधिकारी यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांच्या प्रती धन्यवाद व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केंद्र संचालक सचिन खराडे यांनी केले. यावेळी दैनिक महान कार्यचे पत्रकार सुभाष भस्मे , फाउंडेशनच्या रेखा बिरांजे तसेच स्थानिक रहिवाशी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार शाहीन चौगले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी मंडळाच्या संपदा देसाई, लक्ष्मी कांबळे, शिशु मंदिर आया व सुरक्षारक्षक अमित चव्हाण, सचिन पन्हाळकर इत्यादी आदींनी विशेष सहकार्य घेतले.