प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : क.बावडा येथील भाड्याने राहणाऱ्या महीलेने पती कामानिमीत्त बाहेर गेल्याचे पाहून राजाराम बंधारा जवळील पुलावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.ही घटना आज सकाळी आकराच्या सुमारास घडली असून तेथे उपस्थित असलेल्या भोजने आणि त्यांच्या दोन सहकारयांनी त्या महिलेला बेशुध्दावस्थेत पाण्यातुन बाहेर काढून तिला अग्निशामक दलांच्या गाडीतुन सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे
सदरची महीला सुखरुप असून तिला उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.या घटनेची माहिती सीपीआर पोलिस ठाण्यात झाली आहे.अधिक माहिती अशी की ,यवलूज येथील जोतिराम शिंदे हा पत्नी समवेत क.बावडा येथे चौगुले गल्लीत भाड्याने रहात असून त्यांना एक चार वर्षाचा मुलगा आहे.हा मुलगा सध्या आजोळी रहात आहे.जोतिराम शिंदे यांचे सलूनचे दुकान आहे.त्यांच्या पत्नीचे माहेर बीड जिल्ह्यात आहे.तीचे उच्च शिक्षण पूर्ण झाले आहे.तर जोतिरामचे शिक्षण बारावी पर्यंत झाले आहे.आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे.आपल्या पतीने वाढदिवसाचे काही नियोजन केले नसल्याने वरिल प्रकार घडला आहे .या मध्ये पतीचा कोणताही दोश नसल्याचे त्या महिलेने सांगितले आहे.सदर महिलेने आत्महत्या केलीची माहिती तिच्या पतीला मोबाईल वरुन काहीनी दिल्याचे सांगीतले आहे.या घटनेचा व्हिडीओ ही त्या परिसरात व्हायरल झाला आहे ही माहिती जोतिराम शिंदे यांनी दिली.हीच्या एका चुकीमुळे कारणनसताना जेल मध्ये गेलो असतो असे जोतिराम शिंदे याने बोलून दाखवले आहे.