एकूण 64 जणांना पुरस्कार देण्यात आला.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : जिद्द फाऊंडेशन, कोल्हापूर तर्फे दैनिक परतगंगा यांच्या संयुक्त विद्यमानाने दैनिक परतगंगाचा १४ व्या वर्धापन सोहळा संपन्न झाला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एकूण 64 जणांना पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सिने अभिनेत्री शुभांगी गायकवाड होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष: श्री. सुरेश केसरकर अध्यक्ष राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र , पोलीस मित्र समन्वयक महाराष्ट्र कार्याध्यक्ष योगेश पाटील महाराष्ट्र राज्य.
या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती भाग्यश्री पाटील , प्रा. श्वेता चौगुले , श्री. मदन पलंगे श्री. यासिन सय्यद श्री. दिलीप रेडेकर (सावकार) सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली डोंबे , जिद्द फाऊंडेशन, यासीन सय्यद सचिव , दैनिक परतगंगाचे संपादक सखाराम जाधव , युवा नेते (बीजेपी) राहुल नलवडे उद्योजक नविता अजित नाईक वरीष्ट लिपीक, कोल्हापूर . आदी उपस्थित होते. कार्येक्रमाचे व्यवस्थापक पत्रकार मुरलीधर कांबळे होते. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार शिवाजी येडवान यांनी आभार मानले.