प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : दिनांक 8-5-2023 रोजी लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे हद्दीतील एवंन मोबाईल शॉपी फोर्ड कॉर्नर कोल्हापूर या ठिकाणी तीन अल्पवयीन लहान मुले सकाळ पासून एकटीच थांबलेले असले बाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे माहिती मिळाल्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे 112 डायल चे आमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल 716 रेडेकर यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन भेट घेतली व सदर मुलांची विचारपूस करून त्यांना पोलीस ठाणे येथे आणण्यात आले .
त्यानंतर सदरची तीन मुले ही सकाळपासून उपाशी असल्याने त्यांना प्रथमतः जेवण खाऊ घातले त्यानंतर त्यांना आम्ही विश्वासात घेऊन व मायेचा आधार देऊन त्यांच्याकडे चौकशी केली परंतु त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा मोबाईल अथवा संपर्क नंबर नव्हता चौकशी मध्ये त्यांनी आपले वडील यांनी पुण्यातून रेल्वेने कोल्हापूर येथे आणून आम्हास पहाटेचे वेळी झोपेत असताना सोडून गेले बाबतचे सांगितले त्यावेळी त्यांनी आपली नावे 1-यश संतोष घनगाव वय वर्षे 10, 2-राजाराम संतोष घनगाव वय वर्ष 8 3-अव्या उर्फ अविनाश संतोष घनगाव वय वर्ष 6 सर्व राहणार अण्णाभाऊ साठे नगर जिंतूर जिल्हा परभणी असे सांगितले . व आम्ही सदर मुलांचा शोध घेणे बाबत मोहीम सुरू केली.
त्यानंतर आम्ही सदर मुलांच्या शोध कामी मा.पोलीस निरीक्षक श्री कटकधोंड सर यांचे मार्गदर्शनाखाली तपास केला असता श्री पोलीस निरीक्षक कटकधोंड सर यांनी जिंतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री वाघमारे सर यांचा मोबाईल नंबर प्राप्त करून घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून त्या मुलांचे बाबत माहिती दिली. व त्यांच्याकडून सदर मुलांचे नातेवाईकांचा शोध मिळवला. त्यानंतर मुलांची माहिती मिळताच आम्ही सदर मुलांची काळजी व संरक्षण करिता बालगृहात कोल्हापूर येथे व्यवस्था केलेली होती.
सदर अनुषंगाने आज रोजी तीन लहान मुलांचे आजी आजोबा आजोबा श्रावण घनगाव व आजी सखुबाई घनगाव या लक्ष्मीपुरी पोलीस ठाणेस दाखल झाल्यानंतर त्यांना लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे कडील महिला पोलीस नाईक 304 इनामदार यांनी सदर बालगृहांमध्ये त्यांना घेऊन जाऊन त्या मुलांची भेट घालून दिली त्यानंतर त्या मुलाने आपले आजोबा आजी यांना ओळखून ती मुले त्यांचे जवळ गेली. त्यानंतर बालगृहातील सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सदर तीन लहान मुलांचा शोध लागले ने त्यांना आज रोजी दुपारी 12:30 वाजता परभणी एसटीमध्ये बसून तिकीट काढून देऊन रवाना केलेले आहे सदर बाबत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री .कटकधोंड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन झालेले आहे .
सदर मुलांचा साभाळ योग्य रीतीने व्हावा बाल गृह को ल्हापूर यांचे कडुन बाल कल्याण समिती परभणी यांचे कडुन मुलाचा योग्य रीतीने सांभाळ व्हावा व शिक्षण होई पर्यंत ठेऊन घ्यावे असे पत्र ही दिले त्याना दिले आहे.त्याची परिस्थिती गरीबीची आहे.