प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर : कोल्हापूर जिल्ह्यात काही संस्थाच्या निवडणूका सुरु झाल्या आहेत.कोल्हापुरातील एका संस्थेची निवडणूक लागली असून त्या संस्थेचे उमेदवार आपलया परीने मतदारा पर्यंत पोहचत आहेत.त्यांचे कार्यकर्ते ही मागे नाहीत.आपल्या उमेदवार निवडून येण्यासाठी प्रचाराच्या वेगवेगळ्या आयडीयाचा वापर केला जात आहे.
अशाच एका गटाच्या कार्यकर्त्याने प्रचाराची एक भन्नाट आयडीयाचा वापर केला असून ते सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत.त्या कार्यकर्त्याने आपल्या दुचाकी मोटर सायकलवर विमान या चिन्हाची प्रतिकृती तयार करून बसविली असून समोरच्या बाजूला साउंड सिस्टीमचा लहान बॉक्स लावला आहे.एवढंच नव्हे तर ते चक्क हद्दितल्या पोलिस ठाण्यात परवानगी साठी त्या प्रचाराच्या दुचाकी वरुन अर्ज घेऊन आले होते.त्यांना परवानगी मिळेल का नाही हे अजून गुलदस्त्यातच आहे.पण त्याची कल्पना मात्र सर्वाचे लक्ष वेधून घेत असून त्या बद्दल कुतुहल निर्माण झाले आहे.