जिल्हयात पावसाची पुन्हा जोरदार सुरुवात

       

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -जिल्हयात गेल्या दोन दिवसांपासून वळीव पावसाला सुरुवात झाली आहे.पावसामुळे नागरिकांची फ़ेरीवाल्याची मोठी धांदल उडाली.पावसामुळे वातावरणातील उष्मा कमी होऊन नागरिक सुखावून गेले.या पावसाने अनेकांचे हाल होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


या मध्ये भाजी विक्रेते ,हातगाडी वरिल विक्रेत्याची तारांबळ उडाली.पावसाने शहराच्या काही भागात रस्त्यावर पाणी साचले रस्त्यावर अंधार अशा परिस्थितीत ये -जा करण्यारयाची चांगलेच हाल झाले. शहरा बरोबर उपनगरातही पावसाने हजेरी लावुन चांगलेच झोडपले आणि काही ठिकाणी लग्न मंडपातही लग्न सोहळ्यात चालेल्या जेवणावळीत पाहुण्याची तारांबळ उडाली आणि नवरा - नवरीने छत्री घेऊन पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला तर काही  लोकांनी खुर्च्याचा आधार घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post