सामाजिक कार्यकर्त्या स्वाती काळे यांना अहील्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

                    


प्रेस मीयडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

  कोल्हापूर -जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून विशेष उल्लेखनीय कार्य करणारया महिलांना सन्मानित करण्यात येते.सिध्दार्थनगरातील स्वाती मंगेश काळे यांना 2015 -16 सालचा पुरस्कार जाहीर झाला होता.आज 1 मे कामगार दिनाचे औचित्य साधून श्री.छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे पालकमंत्री मा.श्री.दिपक केसरकर याच्या हस्ते शाल ,श्रीफळ,रोख रक्कम 10  हजार रुपये आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले .

.यावेळी जिल्हाआधिकारी मा.राहुल रेखावार ,पोलिस अधीक्षक मा.बलकवडेसो ,कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मा.कांदबरी बलकवडे तसेच बाल कल्याण विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post