प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : -रविवारी एका महीलेला तिच्या अल्पवयीन मुलासह कंळबा जेल मध्ये शीतपेयाच्या बाटलीतून गांजा व मोबाईल टाकण्याच्या प्रयत्नात असताना सदर महीलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती. संशयीत महीलेने या कामासाठी दोघांनी काही रक्क्म दिल्याची कबुली जुना राजवाडा पोलिसांना चौकशीत दिली.
संशयीत दोघांची नावे उघड झाली असून संबंधितांचा शोध घेण्यात येत आहे असं सांगण्यात आले.कंळबा कारागृहाच्या भिंतीवरुन गांजा,मोबाईल बरोबर इतर वस्तू एका शीतपेयाच्या बाटलीत लपवून टाकण्याचा प्रयत्न रविवारी घडला होता.कारागृहाच्या रक्षकाच्या सतर्कतेमुळेच उघड होऊन रक्षकांनी संशयीत कोमल सुनील भोरे(रा.राजेंद्रनगर ).हीच्या सह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन जुना राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले होते.पोलिसांनी संशयीत महिलेवर प्रश्नांचा भडीमार करताच सदर महीलेने आपल्याला या कामासाठी दोघां जणानी काही रक्क्म दिलयाची कबुली दिली आहे.या दोघांच्या सांगण्यावरुनच कारागृहाच्या भिंतीवरुन वरिल वस्तू टाकण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.त्या दोघांचा शोध घेत असल्याचे जुना राजवाड्याचे तपासाधिकारी गुरवसो यांनी सांगितले.