प्रेस मीडिया लाईव्हचा वर्धापनदिन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्सवात संपन्न.
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
कोल्हापूर : प्रेस मीडिया लाईव्ह हे पुणे येथील आघाडीचे न्युज पोर्टल आहे त्यांनी स्वतःच्या मेहनतीने प्रेस मीडिया लाईव्ह हे 29 मे 2023 रोजी तिसऱ्या वर्षांत पदार्पण करीत आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे चॅनेल अल्पावधीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आहे म्हणूनच या वर्धापनदिना निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल पन्हाळकर यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.प्रसाद कुलकर्णी (सरचिटणीस, समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी ) तर प्रमुख पाहुणे व प्रमुख उपस्थितीत म्हणून मा.श्री. महेबूब सर्जेखान (मुख्य संपादक प्रेस मिडिया लाईव्ह ) मा.श्री.पटलोबा पाटील (जेष्ठ कवी व साहित्यिक इचलकरंजी ) मा.श्री दयानंद लिपारे (पत्रकार दैनिक लोकसत्ता ) मा.श्री. सखाराम जाधव (संपादक दैनिक ग्रामदेवताचे संपादक सखाराम जाधव होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस श्री प्रसाद कुलकर्णी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की समाज जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांना हेरून ,निवड करून त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हे अत्यंत अभिनंदन आहे , त्याच बरोबर जिल्ह्यातील पत्रकारांचा सुद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हे सुद्धा प्रेस मीडिया लाईव्हने अत्यंत चांगले काम केले आहे.
सामाजिक उन्नती बद्दल करीत असलेल्या नि:स्वार्थी समाजसेवा , विविधतेतून एकता व ऐक्य जोपासण्याची सांस्कृतिक परंपरा रुजवत असणाऱ्या तसेच राज्यघटनेची समता बंधुता हि तत्वे प्रमाणभूत मानून धडाडीने समाजसेवा करण्याची तळमळ आणि निष्ठावान जागरूक नागरिक म्हणून कार्यान्वित असणाऱ्या पुरस्कर्तेचे सामाजिक कार्य अभिनंदनीय आणि अनुकरणीय असल्यामुळे प्रेस मिडिया लाईव्हच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एक छोटासा पण जिव्हाळ्याचा व आपुलकीचा सन्मान तसेच आपले मन:पूर्वक अभिनंदन प्रेस मिडिया लाईव्हचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन पुरस्कर्तेना सन्मानित करण्यात आले
यावेळी मान्यवरांनी प्रेस मिडिया लाईव्हच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेल्या पुरस्कर्तेचे अभिनंदन करण्यात आले
पुरस्कार प्राप्त झालेल्या पुरस्कर्तेचे नावे पुढीलप्रमाणे
1-मा.श्री.रहीमान खलिफा -जीवन गौरव पुरस्कार
2-डॉ. विक्रम शिंगाडे -बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार
3-मा.श्री . सलीम महलदार-समाजरत्न पुरस्कार
3-मा.श्री अधिक जाधव -समाजरत्न पुरस्कार
3-मा.श्री दिलीप भिसे -बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार
6-मा.श्री.शुभम कांबळे -समाजरत्न पुरस्कार
7-सो विणा गुंभताज-उधोगरत्न पुरस्कार
8-सौ सुरेखा सातपुते -समाजरत्न पुरस्कार
9-मा.श्री अरुण जमादार -समाजभूषण पुरस्कार
10-अॅड गिरीश खडके -समाजरत्न पुरस्कार
11-मा.श्री ईश्वर परमार -उत्कृष्ट समाज कार्य पुरस्कार
12-मा.श्री . बाबासाहेब पाटोळे -आदर्श पत्रकार पुरस्कार
13-सौ.संगिता होगे उत्कृष्ट समाज कार्य पुरस्कार
14-विश्वास बालीघाटी -आंदोलन सम्राट पुरस्कार
15-मा.श्री दिलीप कोळी -जीवन गौरव पुरस्कार
16-अॅड.प्रशांत शिंदे -समाजरत्न पुरस्कार
17-सौ.संगीता कांबळे -समाजरत्न पुरस्कार
11-मा.श्री गौरव डोंगरे -आदर्श पत्रकार पुरस्कार
19-सौ स्वाती पंडित -आदर्श शिक्षिका पुरस्कार
20-स्वाती काळे -समाजरत्न पुरस्कार
21-मा -.श्री प्रमोद होणगुती-आदर्श पत्रकार
22-मा.श्री मुरलीधर कांबळे -आदर्श पत्रकार पुरस्कार
23-मा-.श्री हारुण संदे-समाजरत्न पुरस्कार
24 -मा.श्री.श्रीकांत कांबळे -आदर्श पत्रकार पुरस्कार
25 -गीतांजली डोबे- समाजरत्नपुरस्कार
26-रहमान चाचा - जीवन गौरव पुरस्कार
27 -मा.श्री विकास गायकवाड - उत्कृष्ट पत्रकार
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरलीधर कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक महेबूब सर्जेखान यांनी केले या प्रसंगी पुरस्कर्तेचे नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते .