मुंबई येथील महेंद्र पंडीत हे कोल्हापुरचे नूतन पोलिस अधीक्षक
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -आज ग्रुह मंत्रालयाकडुन राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाले त्या मध्ये कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक श्री.बलकवडेसो यांचाही समावेश आहे.त्यांची बदली पुणे येथे झाली असून त्यांच्या जागी बृहमुंबईचे श्री.महेंद्र कमलाकर पंडीत यांची कोल्हापूरचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून नेमणूक झाली आहे.
बलकवडेसो यांनी गेल्या तीन वर्षापूर्वी कोल्हापूरचा पदभार स्वीकारला होता. त्यांनी गुन्हेगारीचा आढ़ावा घेऊन गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले , विवीध भागातील सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या मोडून काढले यासाठी त्यांनी मोकाची कारवाई, तडीपार ,जेल मध्ये स्थानबद्ध करण्याचे प्रस्ताव सादर करून नामचीन गुंडाच्यां मुसक्या बांधल्या. दुचाकी वाहन चोरुन विकणारी टोळ्या पकडून कोट्यावधीची वाहने जप्त करण्यात आले.चोरीस गेलेले दागीने ,मोबाईल सायबर सेल द्वारे शोधून तो ज्यांचा त्याना सन्मानाने स्वाधीन केले.अशा कारवाया मुळे त्यांच्या नावाची दहशत निर्माण झाली होती.त्यांच्या काळात अनेक मोठ मोठे फसवणूकीचे गुन्हे ऊघडकीस आले होते.
अलीकडच्या काळात ए .एस.ट्रेडिंग कंपनीने आता पर्यतचा सर्वात कोट्यावधीचा फसवणूकीचा गुन्हा ऊघडकीस येऊन त्यांचा तपास चालू आहे.कोल्हापूरचे नूतन पोलिस अधीक्षक म्हणून नेमणूक झालेले श्री.महेंद्र पंडीत हे अहमदनगर जिल्ह्यातील सिन्नर येथील आहेत.2013 साली आयपीएस झाले.दोन वर्षे त्यांनी प्रशिक्षणार्थी म्हणुन काम करून त्यांची नांदेंड येथे डीवायएसपी म्हणून बढ़ती मिळाली. गडचिरोली येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून 2017 साली काम पाहीले.त्यानी केलेल्या उलेखनीय सेवेबद्दल त्यांना सन्मानचिन्ह मिळाले होते. त्या नंतर त्यांची बृहमुंबई येथे स्पेशल फोर्स ला उप आयुक्त म्हणून बढ़ती मिळाली होती.आणि आता त्यांची पोलिस अधीक्षक म्हणून कोल्हापुरला बदली झाली आहे.