प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-निवारा टेस्टामेटरी ट्रस्ट आणि एनजिओ या कंपनीच्या पुजा अजित भोसले-जोशी (रा.राजारामपुरी 3 री गल्ली).राहुल रमेश भोसले (रा.उचगाव).आणि भरत गाठ (रा.इंचलकरजी).यानी 432 लोकांच्या कडून नोंदणी शुल्काच्या नावाखाली घेतले असून वारंवार मागणी करुनही परत देत नाही म्हनुन शाहुपुरी पोलिस ठाण्यात या तिघा विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
फसवणूकीचा गुन्हा आठवड्या पूर्वी दाखल होऊन ही या तिघांना अजून अटक झालेली नाही.या प्रकरणी सचिन देसाई (नागाळा पार्क).नामदेव जाधव (विक्रमनगर).यांनी तक्रार दाखल केली .त्याचा गुन्हा रजिस्टर नं 0488 ने दाखल आहे. सचिन देसाई हे बांधकाम व्यावसायिक आहेत त्याची राहुल भोसले यांच्याशी ओळख झाली.त्यांनी ट्रस्ट बद्दल माहिती देऊन ओळखीच्या लोकांनाच्या कडुन कागदपत्रासहीत असे मिळून 270 लोकांच्या कडुन प्रत्येकी 4500/ रु .प्रमाणे लाख 69 हजार भरले आणि आठ दिवसात परत देण्याच्या बोलीवर दोन लाख 65 हजार रुपये दिलेत .नामदेव जाधव यांनी ही 270 जणांच्या कडुन बारा लाख 3 हजार रुपये भरले आहेत. या प्रकरणाचा एका वृत्तपत्राने पाच सहा महिन्या पूर्वी या प्रकरणाचा उलगडा केला होता .त्यावेळी तक्रार कुणीही दाखल केली नव्हती.आता यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल झाल्याने या प्रकरणाला गती मिळणार आहे.