प्रेस मीडिया लाईव्ह :
सौ. प्रमोदीनी माने :
कोल्हापूर : दिनांक 10 मार्च 2023 रोजी ग्राहक हित संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य यांचे कडे सौ . कोमल अक्षय पाटील राहणार वाशी यांनी इन्फंट फार्मूला अंतर्गत नवजात बालकांसाठीचे दूध पावडर खराब गुणवत्तेचे प्रॉडक्ट उत्पादन व विक्री करून फसवणूक केल्याने त्याबाबत कारवाईस सहकार्य करणेबाबत अर्ज केला होता त्या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य यांनी 27 मार्च 2023 रोजी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्याकडे अर्जाद्वारे पाठपुरावा केला होता त्या पाठपुरावास यश मिळाले.
एक सामान्य ग्राहकास न्याय मिळवून देण्यात आला व उत्पादित कंपनीस पाच हजार रुपये चा दंड व विक्रीकर्त्यास न्यायालयीन कारवाई प्रस्तावित करण्यात आली यामुळे ग्राहकांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे . भेसळयुक्त खाद्यपदार्थ उत्पादन करून विक्री करणारे यांचे वरती चांगलाच धाक बसला . ग्राहक हित संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य ही ग्राहकांना होणाऱ्या प्रत्येक अडचणीसाठी धावून येणारी लोकाभिमुख संस्था असून ग्राहकांच्या प्रत्येक अडचणीसाठी हक्कासाठी न्यायासाठी लढणारी संस्था आहे . ज्या ग्राहकांना तक्रारी असतील त्या ग्राहकानी ग्राहक हित संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य यांचेकडे संपर्क साधावा असे अवाहन राज्य अध्यक्ष मा. श्री.जगदीश पाटील यांनी केलेले आहे. ग्राहकांना न्याय मिळवून देण्यास सदैव तत्पर....यासाठी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी , राज्य अध्यक्ष--जगदीश पाटील, राज्य उपाध्यक्ष --सचिन लाड,राज्यसंघटक--अशोक ठोमके संघटीका -- प्रमोदनी माने, सल्लागार वकील --विवेक जाधव, सदस्य-गणेश धामोडकर,उत्तम पाटील कोगेकर-समिती यांचे मार्गदर्शन लाभले व सामान्य ग्राहकाना न्याय मिळवून देण्यास संस्था सदैव कटीबद्ध आहे याची प्रचिती आली.