प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर : - अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून बलात्कार केला प्रकरणी रमणळा येथील एका युवकाला आज दहा वर्षे सक्तमजुरी आणि तीस हजार रुपये दंड ठोठावला आणि धमकी दिल्या प्रकरणी दोन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.ही दंडाची रक्कम पिडित मुलगीला देण्याचा आदेश दिले आहेत.गौरव सतीश कांबळे असं आरोपीचे नाव आहे.जिल्हा सत्र न्यायाधीश एम.बी.तिडके यांनी शिक्षा सुनावली.
सौ.अमिता कुलकर्णी यांनी सरकारी वकील म्हणुन काम पाहीले.ही घटना फ़ेब्रु,मार्च 17 सालात घडली होती.शेजारी रहाणारया मुलीशी ओळख निर्माण करून तिला घरी बोलावुन बलात्कार केला होता . त्याने संबंधित अल्पवयीन मुलीला धमकी दिली की ,जर तु कोणाला काही सांगितल्यास तुझ्या आई-वडीलांना ठार मारण्याची धमकी दिली होती.त्यातुन तिच्या पोटात दुखु लागल्याने घरच्यांनी तिला दवाखाण्यात उपचारासाठी नेले असता ती गर्भवती असल्याचे समजले.डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर तिच्या आई वडीलाने त्या युवकाविरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.संरक्षण कायदा आणि इतर कलमान्व्ये गुन्हा दाखल करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते एकूण आठ साक्षीदार तपासून त्यात फिर्यादी,व पिडीत मुलगी ,आणि दोण्ही बाजुचा युक्तीवादानुसार न्यायालयाने वरील शिक्षा सुनावली.याकामी सहाय्यक पो.निरीक्षक टी.जी.देशमुख ,सुरेश परीट ,महिला हवालदार माधवी घोडके यांचे सहकार्य लाभले.