प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकाने धोकादायक इमारत आहे म्हणून पाडल्यामुळे सदर महीलेवर वणवण भटकत रहाण्याची वेळ आल्यामुळे रागाने ज्योती जानवेकर नावाच्या महीलेने महापालीकेच्या पायरीवर स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.तेथे असलेल्या अग्निशामक दलाच्या जवानानी वेळीच हा प्रयत्न हाणून पाडला.
या घटनेनंतर महापालिका खडबडून जागे झाले आणि या संदर्भातील वरिष्ठ पातळी वरुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. जानवेकर आपल्या कुंटुम्बांसमवेत आझाद गल्लीत कूळ म्हणुन रहात होते.दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेने मिळकत धारकांना नोटीस काढ़ून धोकादायक इमारत असल्याबाबत आणि त्या वर कारवाई करण्याबाबत नोटीस बजावली होती , पण या मिळकतीमध्ये रहाणारया कुळानी न्यायालयात दावा दाखल असल्याची माहिती जानवेकर यांनी दिली.
इमारत पाडुन दोन वर्षे होत आली तरी त्याना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.त्यामुळे हे कुंटुंब कधी नातेवाईक तर कधी मित्राच्या घरी रहात आहेत.आता त्याच पत्राचे शेड मारुन रहाण्यासाठी परवानगी देण्यची मागणी करण्यासाठी सोमवारी जानवेकर कुंटुंब महानगरपालिकेकडे परवानगी घेण्यासाठी गेले होते.या संदर्भात निर्णय न झाल्यामुळे ज्योती जानवेकर यांनी महानगरपालिकेच्या पायरीवर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.तेथील अग्निशामक विभागाच्या कर्मचारयानी वेळीच रोखल्यामुळे पुढ़ील अनर्थ टळला. त्यानंतर पोलिसांना माहिती देऊन पोलिस घटना स्थळी दाखल झाले .या कुंटुंबात लहान-लहान मुले असल्याने त्यांना रहाण्यासाठी दुसरया ठिकाणी घर बघून देण्याचे सांगितले जात आहे.पण जानवेकर कुंटुंबानी त्यास त्याना नकार दिला.