एसटी मोटार सायकल अपघातात पत्नी ठार तर पती गंभीर जखमी.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर -कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर मोठा अपघात होऊन मोटार सायकल वरिल पती पत्नीला एसटीने चिरडले त्यात मध्ये पत्नी ठार तर पती गंभीर जखमी झाले.त्याना जखमी अवस्थेत सीपी आर रुगणालयात दाखल करण्यात आले आहे         


 अधिक माहिती अशी की,गगन बावडा कोल्हापूर ही एसटी गाडी नं.MH -20 . BL - 2911 ही एसटी कोल्हापूर कडे येत होती आणि कुडीत्रे येथील  बाबासाहेब पाटील हे पत्नी अंरुधती पाटील यांच्या सह आपल्या मोटार सायकल वरुन कोल्हापूर हन कुडित्रे गावी जात असताना दोनवडे फाट्याजवळ त्याना एसटीने चिरडले त्या दोघांना जखमी अवस्थेत सीपी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचारा पूर्वीच अरुधती पाटील यांचे मृत्यु झाला.तर त्याचे पती गंभीर जखमी झाले.अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली असून पोलिसांनी एसटी चालक महेंद्र संतोष पाटील (रा.नंदुरबार) याला ताब्यात घेतले असून पुढ़ील तपास करवीर पोलिस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post