प्रेस मीडिया लाईव्ह :
खालापूर प्रतिनिधी : दिनेश महाडिक :
कर्जत विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची कर्जत विधानसभा मतदारसंघाची शिवसेनेच्या पदाधिकारी यांची आढावा बैठक व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाला .त्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून या कार्यक्रमासाठी माननीय श्री. विजयजी कदम साहेब ( कोकण समन्वयक) ,माननीय श्री. बबन दादा पाटील (संपर्कप्रमुख) माननीय श्री. मनोहर शेठ भोईर (मा. आमदार तथा जिल्हाप्रमुख रायगड) ,माननीय श्री. नितीन दादा सावंत (उपजिल्हाप्रमुख), माननीय सौ. सुवर्णाताई जोशी (जिल्हा संघटिका रायगड) ,माननीय श्री सुनील पाटील (कर्जत खालापूर विधानसभा संपर्कप्रमुख) ,माननीय सौ .अनिताताई पाटील (उपसंघटिका) ,माननीय श्री. एकनाथ पिंगळे (तालुकाप्रमुख खालापूर), माननीय श्री. उत्तमजी कोळंबे (तालुकाप्रमुख कर्जत) ,श्री महेश पाटील, श्री प्रशांत खांडेकर, श्री.भाऊ सणस (प्रसिद्ध प्रमुख),सौ. सुधा विचारे,सौ शैलाताई भगत, श्री. उमेश गावंड, श्री मंगेश पाटील व कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व आजी-माजी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीमध्ये सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शन लाभले. आता रडायचं नाही तर जिंकेपर्यंत लढायचं असं सर्व शिवसैनिकांना सांगण्यात आले