प्रेस मीडिया लाईव्ह :
खालापूर प्रतिनिधी : दिनेश महाडिक
श्री क्षेत्र महड अष्टविनायक येथून गोठ्यातून गाभण गाय चोरून हाल खुर्द येथे नेऊन आरोपी शहानवाज बेडेकर व त्याचा साथीदार यांनी त्याच्यात असलेल्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्येअत्यंत क्रूरपणे गोमातेची हत्या केली. हे निंदनीय प्रकार पाहून लगेचच पोलीस यंत्रणेला (प्रशासनाला) बोलावून या निंदनीय कृत्याची पाहणी करण्यास सांगितले. पोलीस प्रशासन या घडलेल्या प्रकाराची पाहणी करत असताना खालापूर तालुक्यातील बजरंग दल विश्व हिंदू परिषदेतील व महाडमध्ये ग्रामस्थांचा जमाव होताना दिसला .त्या जमावाला शांत करून आरोपी शहानवाज बेडेकर व त्याचा साथीदार यांना पोलिसांनी लगेचच अटक केली व जमावाला शांत करत तेथील पत्र्याची शेड तोडून गोमातेला व वासराला व्यवस्थितपणे खड्डा खोदून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
झालेला निंदनीय प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून वारकरी महामंडळ युवा संघटना महाराष्ट्र राज्य, च्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री ह भ प दिनेश महाडिक, कार्याध्यक्ष श्री ह भ प योगेश कदम , खालापूर तालुका अध्यक्ष श्री ह भ प हनुमंत विष्णू लभडे, थोर समाज प्रबोधनकार श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज पाटील, श्री ह भ प रुपेश लबडे, श्री ह भ प सूर्यकांत लोते, श्री ह भ प संदीप सुर्वे, श्री ह भ प कुमार पाटील, श्री ह भ प सत्यवान देशमुख, व विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत कुलाबा जिल्हा रमेश जी मोगरे ,सकल मराठा समाज 36 विभाग महेशजी पाटील, शशिकांत मोरे ,मोहन घाडगे, बजरंग दल खालापूर तालुका गोरक्षक श्री रुपेश बाळकृष्ण लबडे, अध्यक्ष आध्यात्मिक आघाडी भाजपा मा. श्री काशिनाथ पारठे, उपतालुकाप्रमुख खालापूर श्री अशोक मराजगे, तालुकाध्यक्ष युवा मोर्चा भाजपा मा.श्री . प्रसाद पाटील, श्री जयेंद्र पाटील ,संदेश पाटील, वेद सह्याद्री खोपोली चे आकाश घरडे, पंकज पालांडे, या विविध संघटनांनी सर्वांनी मिळून माननीय वरिष्ठ निरीक्षक खालापूर श्री बाळासाहेब कुंभार तसेच खालापूर तहसीलदार श्री. आयुब साहेब तांबोळी यांना झालेली निंदनीय अशी गो-हत्या या संदर्भात झालेल्या प्रकाराबद्दल निषेध दर्शवीत निवेदन देण्यात आले.