ग्रामीण भागात केबल चोरीचे प्रमाण वाढले..


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : कबनुर, कोरोची,तीळवणी, साजणी,रूई,चंदूर येथील विहीरी वरील मोटारी व नदीवरील मोटारीनचे केबल कापून मोठ्या प्रमाणात चोरी केली जात आहे , चोरांना कोणत्या भागात रात्री लाईट जाणार आहे याची कल्पना असते व तो मोका साधून रात्री केबल कापून घेऊन जातात,  

केबल चोराना पोलिसांची भीती आहे , ना कायद्याचा धाक राहिला आहे ,  पोलिस शहरात रात्री गस्त घालतात पण खेड्यातल्या मळे भागात व नदी कडेला शेतकऱ्यांना वाली कोण..? असा प्रश्न सर्वाँना पडला आहे. या केबल चोरांचा  तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा व रात्री  ग्रामीण भागात सुद्धा गस्त वाढवा वा अशी मागणी होऊ लागली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post