इचलकरंजी महापालिकेने विकासकामे दर्जेदार करण्याची इनाम संघटनेची मागणी

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी  :

इचलकरंजी शहरात सुरू होणारी विकासकामे दर्जेदार असावीत तसेच बिलो टेंडरसाठी प्रयत्न करावेत अशा मागणीचे निवेदन इनाम संघटनेच्या वतीने महापालिकेचे  प्रभारी उपायुक्त केतन गुजर यांना देण्यात आले.

इचलकरंजी महानगरपालिका झाल्यानंतर नुकतीच जिल्हा विकास योजना २०२२-२३ व दलितवस्ती सुधार योजनेतून बऱ्याच कामांना मंजुरी मिळाली आहे. महानगरपालिका झाल्यानंतर काही महिने गेले आहेत.परंतू , विकासकामांसाठी निधी कमतरता असून बऱ्याच भागात बरीच कामे प्रलंबित आहेत. यासाठी प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबविताना बिलो टेंडरसाठी प्रयत्न करणे तसेच दर्जेदार विकासकामे करून घेणे गरजेचे आहे.

इचलकरंजी शहरातील विकास कामांवर व त्याच्या दर्जावर इनाम संघटनेचे लक्ष असणार आहेच. परंतू  महापालिका प्रशासनाने देखील बिलो टेंडरसाठी प्रयत्न करावेत ,अशा मागणीचे  निवेदन इनाम संघटनेच्या वतीने महापालिकेचे प्रभारी उपायुक्त केतन गुजर यांच्याकडे सादर केले.

यावेळी त्यांनी या मागणी संदर्भात आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल , असे चर्चेअंती आश्वासन दिले.यावेळी इनामचे राम आडकी,महेंद्र जाधव,राजू कोन्नुर,जतीन पोतदार,अभिजित पटवा आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post