प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील तांबेमाळ परिसरात सरकारी शाळे जवळील मुतारीमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे.तसेच मुतारीशेजारील ड्रेनेजमधून सर्व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत आहे.त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरुन नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.
इचलकरंजी शहरात कचरा उठाव ,गटारींच्या नियमित स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना मोठा फटका बसत आहे.शहरातील अनेक प्रभागात कच-याचे साम्राज्य पसरुन त्याची दुर्गंधी साथीचे आजार फैलावण्यास निमंत्रण देणारी ठरत आहे.शहरातील तांबे माळ ,लिंबू चौक ,कुडचे मळा ,षट्कोन चौक ,नाईक मळा या परिसरात कच-याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.सर्वसामान्य नागरिक याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार करुनही याची कोणतीच दखल घेतली जात नाही.त्यामुळे शहरातील कचरा उठाव , गटारींची नियमित स्वच्छता या प्रश्नाचे गांभीर्य वाढून डेंग्यू सदृश साथीचे आजार फैलावून नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.असे असतानाच तांबेमाळ परिसरात सरकारी
शाळेजवळील मुतारीमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे.तसेच मुतारीशेजारील ड्रेनेजमधून सर्व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत आहे.त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरुन नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.याचे महापालिका प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.