प्रबोधिनीत ' निर्भय बनो ' विषयी मुक्त संवाद

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत प्रा. डॉ. विश्वंभर चौधरी (पुणे ) हे ' निर्भय बनो ' या विषयावर पुरोगामी राजकीय पक्ष व संस्था संघटनेच्या कार्यकर्त्यांशी मुक्त संवाद साधणार आहेत.यावेळी ऍड.असीम सरोदे,कुमार नागे हेही सहभागी असणार आहेत. हा कार्यक्रम  रविवार ता.७ मे २०२३ सायं.४.३० ते ६ यावेळेत समाजवादी प्रबोधिनी, राजर्षी शाहू पुतळ्या जवळ, इचलकरंजी येथे होणार आहे.

इचलकरंजी व परिसरातील सर्व पुरोगामी राजकीय पक्ष,सामाजिक संस्था संघटना यांच्या वतीने आणि समाजवादी प्रबोधिनीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास  कार्यकर्त्यांनी यावे आणि  संवादात सहभागी व्हावे असे आवाहन प्रताप होगाडे ( ९८ २३० ७२ २४९),प्रसाद कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post