इचलकरंजीचे RTO कार्यालय : सुरेश हाळवणकरांनी लावलेल्या रोपट्याची फळे प्रकाश आवाडे यांना मिळाली


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी : सुरेश हळवणकर 2009 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हा त्यांनी इचलकरंजीत नसलेल्या विविध शासकीय कार्यालये इचलकरंजीत आणण्याचा चंग बांधला त्यांच्याच प्रयत्नातून अप्पर तहसीलदार कार्यालय इचलकरंजी सुरू झाले अतिरिक्त नगर भूमापन कार्यालय सुद्धा सुरू झाले पासपोर्ट कार्यालय चालू झाले परंतु परिवहन कार्यालय मात्र त्यांना आणता आले नाही

इचलकरंजीत स्वतंत्र आरटीओ कार्यालय होण्यासाठी त्यांनी मोठा पाठपुरावा केला परंतु 2009 ते 2014 या कालावधी झालेल्या वजाबाकीच्या राजकारणाचा मोठा फटका त्यांना बसला आणि इचलकरंजीचे अंतिम टप्प्यात असलेले परिवहन कार्यालय कराडला गेले. परिवहन कार्यालयासाठी इचलकरंजी नगरपालिकेने आरक्षित असलेला भूखंड हळवणकरांनी देऊ केला तसेच थोरात चौकातील नगरपालिकेच्या गाड्यांमधील जागा सुद्धा देऊ केली. इचलकरंजी हातकणंगले शिरोळ तालुक्यातील वाहन संख्या सुद्धा परिवहन कार्यालयाच्या निकषांमध्ये बसत होते.  

इचलकरंजी कराड आणि नागपूर पूर्व या तीन ठिकाणी परिवहन विभागाचे प्रादेशिक कार्यालय स्थापन करण्याचा संयुक्त प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी गेला मात्र मंजुरी फक्त कराड आणि नागपूर पूर्व या दोनच कार्यालयांना मिळाले इचलकरंजीचे नाव वगळले गेले आणि नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याचे निकष बदलले गेले अखेर हळवणकरांचे भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रयत्न चालू केले. इचलकरंजी शिरोळ आणि हातकणंगले मधील वाहन संख्या व इतर निकष परिवहन कार्यालयासाठी पात्र झाले.

 2019 मध्ये  प्रकाश आवाडे आमदार झाले.अशा प्रकारे सुरेश हाळवणकरांनी लावलेल्या रोपट्याची फळे प्रकाश आवाडे यांना मिळाली. पण यातून एक गोष्ट सिद्ध झाली की पूर्वीच्या काळात वजाबाकीचे राजकारण झाले होते तसे आता भाजप महायुती  सरकारच्या काळात बेरजेचे राजकारण झाले.

Post a Comment

Previous Post Next Post