प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी
मानवी जीवनात शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. पालकांनी आपल्या पाल्यावर संस्कार, विश्वास व नितीमुल्यांची शिकवण देणे आवश्यक आहे. आजच्या सामाजिक जीवनात पालकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. शिक्षणाबद्दल आस्था निर्माण करणे, प्रोत्साहन देणे, शैक्षणिक बौद्धीक, समृद्धी वाढविणे गरजेचे आहे ,असे मत माजी प्रा. मिलिंद दांडेकर यांनी व्यक्त केले.
येथील देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्समध्ये माजी विद्यार्थी- पालक-शिक्षक संघटनेच्या मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एस. एल. रणदिवे होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. एस. एल. रणदिवे यांनी सामाजिक बदल होताना शैक्षणिक विकास व पालकांच्या वाढत्या जबाबदारीची जाणीव करून दिली. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. पुरंधर डी. नारे यांचेही मौलिक मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. आर. व्ही. सपकाळ यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. डॉ. प्रविण पोवार यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्रा. सौरभ पाटणकर, प्रा. एफ. एन. पटेल, प्रा. अभिजित पाटील, प्रा. जीवन पाटील यांच्यासह विद्यार्थी-पालक संघटनेचे सदस्य, पालक उपस्थित होते. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एम.आर. मुंडकर यांनी केले.