इचलकरंजी : समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने ख्यातनाम पत्रकार श्रीराम पवार यांचे 'भारताची संकल्पना ' या विषयावर जाहीर व्याख्यान



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने ख्यातनाम  पत्रकार श्रीराम पवार यांचे 'भारताची संकल्पना ' या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. समाजवादी प्रबोधिनीच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार ता.९ मे २०२३रोजी सायं.६  वाजता हे व्याख्यान होणार आहे

 व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ.अशोक चौसाळकर आहेत. समाजवादी प्रबोधिनी,राजर्षी शाहू पुतळ्याजवळ, इचलकरंजी येथे होणाऱ्या या व्याख्यानास इचलकरंजी व परिसरातील जिज्ञासू नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन समाजवादी प्रबोधिनी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post